shashi tharoor. 
देश

भाजपचे 'लाइट व्हर्जन' बनण्याच्या प्रयत्नात काँग्रेस 'झिरो' होईल- शशी थरुर

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- सिद्धांत आणि व्यवहाराच्या दृष्टीने धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे. सत्ताधारी भाजप पक्ष या शब्दांना संविधानातून काढून टाकण्याचा प्रयत्न करु शकते, असं वक्तव्य काँग्रेसचे (Congress) खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी केलं आहे. द्वेष पसरवणाऱ्या शक्ती देशाचा धर्मनिरपेक्ष चेहरा कधीही बदलू शकणार नाहीत, असंही ते म्हणाले आहेत. थरुर आपल्या 'The Battle of Belonging' या पुस्तकाविषयी दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. 

धर्मनिरपेक्षता केवळ एक शब्द जरी असला, तरी तो संविधानातून काढला जाऊ शकतो. पण, मूलभूत संरचनेमुळे आपले संविधान सेक्युलरच राहिल, असं थरुर म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, ''काँग्रेस पक्ष भाजपचे 'लाईट व्हर्जन' बनण्याचा धोका पत्करु शकत नाही. असा कोणताही प्रयत्न काँग्रेसला शून्याकडे घेऊन जाईल. काँग्रेस पक्ष कधीही भाजपच्या राजनैतिक विचारधारेचे सॉफ्ट रुप धारण करणार नाही.  काँग्रेसमध्ये भारताच्या धर्मनिरपेक्षतेची भावना खोलपर्यंत रुजली गेली आहे.''

पाकिस्तानमध्ये अभिनंदन वर्धमान आणि मोदींचे पोस्टर्स; जाणून घ्या काय आहे कारण

काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदूत्वासंबंधीचा प्रश्न शशी थरुर यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना थरुर म्हणाले की, काही उदारवादी भारतीयांसाठी हा मुद्दा खूप गंभीर आणि चिंतेचा विषय असू शकतो. पण, काँग्रेस पक्षाचा विचार स्पष्ट आहे की भाजपचा लाईट व्हर्जन बनण्याकडे कल असणार नाही. काँगेस असा कोणताही प्रयत्न करत नाहीये. 

हिंदूवाद (Hinduism) आणि हिंदूत्व (Hindutva) यामध्ये काँग्रेसकडून करण्यात आलेला फरक सांगताना थरुर म्हणाले की, ''हिंदूवाद ज्याचा आम्ही सन्मान करतो तो खूप उच्च पातळीवर आहे, दुसरीकडे हिंदूत्व एक राजनैतिक विचारधारा आहे. जी संकूचित आणि लोकांना एकमेकांपासून वेगळे करणारी आहे.'' तिरुवनंतपुरमचे खासदार असलेले थरुर म्हणाले की, आम्ही कधीही भाजपच्या राजनैतिक विचारधारेचे सॉफ्ट रुप धारण करणार नाही. राहुल गांधी यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केले आहे. आपल्या धार्मिक मान्यतेनुसार, मंदिरात जाऊन ते कोणत्याही सॉफ्ट किंवा कट्टर हिंदूत्वाचे समर्थन करत नाहीयेत. काँग्रेसने स्पष्ट केलंय की धर्मनिरपेक्षता हा त्यांच्या मूलभूत विचारधारेचा विषय आहे आणि या प्रकरणी ते पूर्णपणे प्रतिबद्ध आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Sangli : शाळेय विद्यार्थिनीला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी अपडेट समोर, पळालेल्या संशयितांना अटक; त्यादृष्टीने सखोल तपास

Latest Marathi News Updates : भारतीय अंतरिक्षवीर शुभांशु शुक्ला १४ जुलैपासून पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील - नासा

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

टोमणे सहन न झाल्याने टेनिसपट्टू राधिकावर बापानेच झाडल्या गोळ्या; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT